Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
July 24, 2026
in Uncategorized
0
धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
उस्मानाबाद : नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थी, महिला व आंदोलक यांच्यावर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिवसह जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शांततापूर्ण दि.२३ जुलै रोजी बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर काही शाळांनी सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची संभाव्य त्रासापासून सुटका होण्यास मदत झाली.

महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी व शाळा संस्थाचालक तसेच खाजगी वाहनधारक यांना या बंदमध्ये सहभाग नोंदवून देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या जुलमी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवावा असे आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नाहीत. मात्र, मेडिकल व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना या मधून वगळण्यात आले होते. शहरातील दुकाने बंद असल्याने कुठलेही व्यवहार झाले नाहीत. तर बाहेर गावाहून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न आणणे पसंद केले. 

धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी शांततामय वातावरणात दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन केले. 

या बंद आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला रिपब्लिकन पार्टी खरात गट, रिपब्लिकन सेना काॅंग्रेसने पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि एस.टी. महामंडळ विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये आंदोलन संविधानिक, लोकशाही व पूर्णतः शांततापूर्ण मार्गाने पार पडणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली होती.

यावेळी विकास बनसोडे, भैय्यासाहेब नागटिळे, नंदकुमार हावळे, भाई फुलचंद गायकवाड, प्रा. के. टी. गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे विजय बनसोडे, धनंजय वाघमारे, सचिन दिलपाक, रोहित बनसोडे, अक्षय बनसोडे, कुंदन वाघमारे, बंटी वाघमारे, यशपाल गायकवाड, सुजाता बनसोडे, सुनिल वाघमारे, विरेंद्र झेंडे, आनंद गाडे, रमेश गंगावणे, बप्पा शिंदे, राजा राऊत, काश्यप बनसोडे, प्रतीक गंगावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, वाहनचालक, शेतकरी, कामगार, विविध सामाजिक संघटना आणि संविधान प्रेमी नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Tags: DharashivJantar MantarMaharashtraMaharashtra BandhNEET Paper LeakPrakash Ambedkar
Previous Post

NEET पलीकडचा संघर्ष : शिक्षण, आरोग्य आणि व्यवस्थात्मक बदलाची अपरिहार्यता

Next Post

पानगावमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
बातमी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

by mosami kewat
August 12, 2026
0

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी...

Read moreDetails
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

August 12, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home