औरंगाबाद : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
या विशेष उपक्रमांत युवा जोडो अभियान, महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात मिळवण्यासाठी स्वाक्षरी अभियान तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवक-युवतींनी स्वाक्षरी करून व रक्तदान करून आपले योगदान नोंदविले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा महासचिव सतीश शिंदे, शहराध्यक्ष संदिप जाधव, शहर महासचिव आशुतोष नरवडे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर उपाध्यक्ष निलेश बनकर, सुमेध खंडागळे, संघर्ष गायकवाड, किरण काळे, सौरभ नरवडे, संघपाल जगधने, कपिल चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे व पश्चिम कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले.
ऐतिहासिक मोर्चा – निर्भीड नेतृत्व
- सुशांत कांबळे आजपर्यंत राजकीय चर्चा-टीकेमध्ये आपण पाहतो की राज्यातील काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते वंचित बहुजन आघाडीबद्दल...
Read moreDetails






