लातूर : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल वापरलेल्या अपशब्दांविरोधात वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.
या निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने आमदार संग्राम जगतापच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. अशा प्रकारची विधाने समाजात तेढ निर्माण करू शकतात, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
जातीय एकता राखण्यासाठी आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. यावेळी वंचित बहुजन आघाडी शिरूर अनंतपाळचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांमध्ये तालुकाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, हनुमंत बनसोडे, सचिन गंडिले, उपाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड, महासचिव हनुमंत बनसोडे, आनंदकुमार सोनकांबळे, रमेश सूर्यवंशी, सुखदेव सूर्यवंशी, आयटी प्रमुख धनराज जरीपटके, गणेश कांबळे, सचिन मांदळे, चेतन कुमार मधाळे, सय्यद खुर्दळी, विकास सूर्यवंशी, इंद्रजीत जाधव, सिद्धार्थ बानाटे, जगदीश काकडे, काबळे विनायक, कांबळे बालाजी, कमलाकर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, दत्ता कांबळे, बाबासाहेब कांबळे, आणि राहुल सूर्यवंशी यांचा समावेश होता.
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष
नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण...
Read moreDetails






