Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शीतल मोरे प्रकरणात कारवाईचा विलंब; कारवाई न केल्यास सिव्हिल सर्जन कार्यालयातच करू वर्षश्राद्ध – चेतन गांगुर्डे

mosami kewat by mosami kewat
November 19, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शीतल मोरे प्रकरणात कारवाईचा विलंब; कारवाई न केल्यास सिव्हिल सर्जन कार्यालयातच करू वर्षश्राद्ध - चेतन गांगुर्डे

शीतल मोरे प्रकरणात कारवाईचा विलंब; कारवाई न केल्यास सिव्हिल सर्जन कार्यालयातच करू वर्षश्राद्ध - चेतन गांगुर्डे

नाशिक : मयत शीतल मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात मुख्य दोषींवर अद्यापही कारवाई न झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. ‘सर्व पुरावे स्पष्ट असतानाही जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांची संपूर्ण टीम अजूनही मोकाट आहे’, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आंदोलनादरम्यान जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी कठोर भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला.

“शीतल मोरे प्रकरणात तत्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर आम्ही मृत शीतल मोरे यांचे वर्षश्राद्ध थेट सिव्हिल सर्जनच्या कार्यालयात करू,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. गांगुर्डे यांनी सांगितले की,

  • प्रकरणातील सर्व पुरावे उपलब्ध आहेत.
  • संबंधित अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा उघड आहे.
  • तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

यामुळे पीडित कुटुंब न्यायासाठी भटकत आहे आणि प्रशासन अनाकलनीय शांत आहे, असा आरोप त्यांनी केला.

या आक्रमक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, महिला जिल्हा अध्यक्षा उर्मिला गायकवाड, युवा जिल्हा अध्यक्ष दामोदर पगारे, रवी अण्णा पगारे, दीपक पगारे (युवा महानगर प्रमुख), युवराज मनेरे (युवा महानगर महासचिव), विकास लाटे, संतोष वाघ (तालुका महासचिव),

विकी वाकळे (तालुका अध्यक्ष), नाना तपासे (महानगर उपाध्यक्ष), सचिव राहुल नेटवटे, तसेच समीर गायकवाड, सचिन आहिरे (निफाड तालुका अध्यक्ष), राजू धोत्रे, राजू गोतीस, विलास गुंजाळ, बाबा निकम, दीपक नावळे (संघटक), समाधान शिलावट, शब्बीर शेख, माया मोरे, मनोज उबाळे, शाहरुख पठाण (महानगर उपाध्यक्ष), नीतू सोनकांबळे, संपत हिवराळे, संभाजी कारके, मिहिर गजबीये (सम्यक जिल्हा अध्यक्ष), वाल्मिक गायकवाड, विनोद शेलार, अजय केंदळे, सोमा मोहिते, रूपचंद चंद्रमोरे, आदित्य दोंदे, निलेश मोरे (पीडितांचे पती), नितीन वाघ, आनंद साबळे, सुरज दीक्षा सुदान, धम्म गौतमी आदींचा समावेश होता.

आंदोलनादरम्यान ‘शीतल मोरेला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘दोषींना निलंबित करा’, ‘सिव्हिल प्रशासन जागे हो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आता प्रशासन या इशाऱ्याला काय प्रतिसाद देते आणि पुढील कारवाई किती वेगाने केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Tags: MaharashtraMedicalNegligencenashikPoliticalpoliticsprotestVanchit Bahujan AghadivbaforindiaWomenJustice
Previous Post

वंचित बहुजन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शीतल मोरे प्रकरणात कारवाईचा विलंब; कारवाई न केल्यास सिव्हिल सर्जन कार्यालयातच करू वर्षश्राद्ध - चेतन गांगुर्डे
बातमी

शीतल मोरे प्रकरणात कारवाईचा विलंब; कारवाई न केल्यास सिव्हिल सर्जन कार्यालयातच करू वर्षश्राद्ध – चेतन गांगुर्डे

by mosami kewat
November 19, 2025
0

नाशिक : मयत शीतल मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात मुख्य दोषींवर अद्यापही कारवाई न झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी...

Read moreDetails
वंचित बहुजन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वंचित बहुजन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

November 19, 2025
भव्य जाहीर सभा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार; सुजात आंबेडकर

भव्य जाहीर सभा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार; सुजात आंबेडकर

November 19, 2025
डिजिटल अडथळ्यांनी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारी!

डिजिटल अडथळ्यांनी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारी!

November 19, 2025
पुण्यात ऐतिहासिक बौद्ध विहाराच्या तोडफोडीवरून वंचित बहुजन आक्रमक

पुण्यात ऐतिहासिक बौद्ध विहाराच्या तोडफोडीवरून वंचित बहुजन आक्रमक

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home