Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट

mosami kewat by mosami kewat
February 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट
       

बीड : गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांवर १३ फेब्रुवारी रोजी गावातील काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महिला आणि बालकांना बेदम मारहाण करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी गरिबांची घरे आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे उध्वस्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ घरेच पाडली नाहीत, तर शेतातील सहा बोअरवेल दगडांनी भरून बुजवून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे, शासनाकडून मिळालेली घरकुलेही जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या मारहाणीत एक तरुण मुलगी गंभीर जखमी झाली असून, ती सध्या बीड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) मृत्यूशी झुंज देत आहे. पीडित कुटुंबातील मुलांना शाळेत येण्यासही मज्जाव केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, गुरुवार (दि. १९)   वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी सुर्डी येथे घटनास्थळाला भेट दिली. पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला. यावेळी चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि गट विकास अधिकारी (BDO) यांची भेट घेऊन चर्चा केली व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

शिवजयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन

शिवजयंतीचे औचित्य साधून घटनास्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. “रयतेच्या राजाच्या राज्यात रयतेवरच अन्याय होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विष्णू जाधव, गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. 


       
Tags: ActrocitybeedJusticeMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकले – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात!

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकले – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकले - ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 1, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पर गंभीर आरोप लगाए हैं।...

Read moreDetails
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

April 1, 2026
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

April 1, 2026
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home