– प्रा. ज्ञानेश्वर कांबळे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा करून ६० वर्षे पूर्ण झाली. हे सुवर्ण महोत्सवी दशक आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्ष जगभरात जोरात केले जात आहे. “हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” ही बाबासाहेबांनी केलेली घोषणा संबंध देशातील सत्ताधारी धर्म पंडितांना हादरा देणारी होती. शतकानुशतकेचा धर्मसंस्कृतीला, धर्मशास्त्राला धक्का देणारी होती तर धर्म संशोधन काळाच्या विश्वातील लोकांसाठी मानवमुक्तीचा पहाट होती. जगाच्या पाठीवर हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म होता की, इथे मानवाला पशुपेक्षाही हीन लेखले जात होते. श्रेष्ठतम त्याच्या बुद्धीकुशल न ठरता जातीनं ठरत होते याला धर्म ग्रंथांचा आधार होता.
या विषय समाजसुधारकांनी अंधश्रद्धेची पेरणीही चाणाक्षपणे धर्मशास्त्रांनी केली होती. कितीही काही केले तरीही मानवाला धर्मांनी आणि धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या चोखटीतून बाहेर पडता येत नव्हते. ज्ञानेश्वरच धर्मसंस्थेचं कारणंयाचा अधिकाऱ्यांनी नाकारलेला होता. एवढेच नाही तर त्याचा स्पर्श नकोसा होता. त्याच्या सावलीचाही विटाळ होत होता. त्याला अस्पृष्य म्हणूनच वागविले जात होते. तरीही हा समाज शतकानुशतकांपासून मुकपणाने आपले जीवन जगत होता. पहिल्या जन्माचे काहीतरी पाप म्हणून मी या अस्पृश्य जातीत जन्माला आलो आणि आता मरेपर्यंत मला असेच जगावे लागणार आहे. हा हिंन्दू धर्म ग्रंथातील कर्मविपाकाने घालून दिलेला नियम तो तंतोतंत पाळत होता.
गुलांमापेक्षाही अस्पृश्यता वाईट आणि भयावह होती. डॉ. बाबासाहेब आबेडकर म्हणतात. “गुलाम हे भारतातील अस्पृश्यांपेक्षा बरेच मुक्त होते. कायदयाने गुलाम हे मुक्त नव्हते, तरीदेखील व्यक्तिमत्व विकासाकरीता आवश्यक असणारे स्वातंय त्यांना होते. अस्पृश्य क्त कायदयाच्या दृष्टीने मुक्त असले तरीही सामाजिक दृष्टया व्यक्तीमत्व विकासाचे त्यांना स्वातंय नाही.” पुढे बाबासाहेब म्हणतात की, अस्पृश्यता ही अप्रत्यक्ष गुलामगिरीचा प्रकार आहे. अस्पृश्याला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करुन न देता लादलेली ही गुलामगिरी होय. या वरुन हे लक्षात येते की. अस्पृश्य हे गुलामही आणि अस्पृश्यही होते. या उलट गुलाम हे अस्पृश्य नव्हते. भारतातल्या हिंन्दू समाजाला अस्पृश्यता ही समस्या कधीच वाटली नाही.
तर अस्पृश्यता म्हणजे एक जीवनप्रणाली आहे आणि हाच खरा धर्म आहे. असे असल्यामुळे अस्पृश्यता नष्ट होणे कदापिही शक्य नव्हते हे मान्यच करावे लागते. भारतावर इंगजांचे साम्राज्य येणे हे भारतीय सामाजिक विषमताग्रस्त समजासाठी इष्टाप्पतीच मानली पाहिजे. इंग्रजांनी भारतात त्यांच्या सोयीसाठी का होईना शिक्षणाचे सार्वकीकीकरण केले इंग्रजी भाषेबरोबरच पाश्चात्य संस्कतिचा शिरकाव समाजस्तरावर झाला. इंग्रजी शिक्षण घेवून पाश्चात्य संस्कतिची ओळख झालेला तरुण वर्ग भारतीय धर्म आणि धर्मग्रंथांची चिकित्सा करु लागला तेव्हा भारतीय धर्म संस्थेतील आणि समाज व्यवस्थेतील विषमता लक्षात आल्यानंतर यात सुधारणा झाली पाहिजे असे त्यांना मनोमन वाटू लागले.
त्यात दादोबा तर्खडकर, लोकहितवादी, न्या. रानडे, म. फुले इ. समाजसुधारक कार्य करत होते. इतर समाजसुधारकांच्या तुलनेत म. फुलेंनी केलेले कार्य हे कृतीशील आणि रचनात्मक होते. हे मान्यच करावे लागते. आधुनिक काळाला सर्वकष बळ देणारा महापुरुष म्हणजे म. फुले होत. म. फुल्यांनी आधुनिक मानसिकता घडवली म्हणूनच त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या समकालीन आणि भविष्यकालीन समाजसुधारकांवर आणि साहित्यिकांवरही पडला. त्यांनी सिायांचा कैवार घेतला नसता तर बाबा पदमजींनी “यमुना पर्यटन” नावाची कादंबरी लिहीली नसती. महात्मा फुल्यांच्या प्रभावातूनच राजर्षी शाहू महाराजांनीही समाज परिवर्तनाचे मौलीक असे कार्य केले.
त्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा झंझावात सुरु झाला. आणि सामाजिक उलथापालथीला गती प्राप्त झाली. विसाव्या शतकात उदयाला आलेल्या या जगविख्यात तत्ववेत्त्याने धर्म आणि धर्मशासाची चिकित्सा करुन हिंन्दू धर्मातील थोतांड जाहीर केले. आणि मानवमुक्तीची गर्जना केली. समाजव्यवस्थेतील विषमतेची दरी मिटल्याशिवाय राष्ट्र विकास शक्यच नाही या मतावर बाबासाहेब ठाम हाते. अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे जातीयता नष्ट करणे, म्हणजे धर्मव्यवस्था आणि समाजव्यवस्था उध्दवस्त करणे आहे म्हणून धर्मव्यवस्थेच्या चौकटीत राहूनच अस्पृश्यता नष्ट करता येईल असे सांगणारे म. गांधीजींसारखे समाजसुधारक होते. तसा त्यांनी प्रयत्नही केला होता परंतु जातीव्यवस्थेवर आघात न करता अस्पृश्यता नष्ट होऊच शकत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ठाम मत होते. ते म्हणतात. “मानसशास्त्रीय दृष्ट्या जात व अस्पृश्यता ही अविभाज्य असून एकाच तत्वावर आधिष्ठित आहे.
हिंदुंची जातीवर श्रध्दा असल्यामुळेच ते अस्पृश्यता पाळत आहेत” पुढे बाबासाहेब म्हणतात की. “जेव्हा हिंदू आपली मनोवृत्ती बदलतील त्याचवेळी अस्पृश्यता नष्ट होईल. हिंदुंना त्यांची ही जीवनपध्दती बदलण्यास कसे सांगायचे? हा खरा प्रश्न आहे. पुर्वापार चालत आलेली जीवनपध्दती पूर्णपणे बदलणे तीतके सोपे नाही. या पुर्वापार जीवनपध्दतीशिवाय हिंदू हे धर्मास बांधील आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते धर्माचे उल्लंघन करणार नाहीत आणि त्यांची जीवनपध्दती बदलणे म्हणजे जवळजवळ त्यांचा धर्म बदलणे होय.” उपरोक्त विधानावरुन असे लक्षात येते की, हिंदू धर्माची व्यवस्थाच जाणीवपूर्वक विषमताधिष्ठित बनविण्यात आली होती म्हणूनच बाबासाहेबांना अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून हिंदू धर्मच कलंकित आहे असे वाटत होते.
म्हणून अस्पृश्यांची सुटका या प्रस्थापित समाजव्यवस्थेतून होईल अशी कोणतीच आशा त्यांना वाटत नसल्यामुळेच त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातराची घोषणा केल्यानंतर कोणता धर्म स्विकारायचा? याचे अनेक पर्याय त्यांच्यासमोर होते. अस्पृश्यांच्या सर्वागीन प्रगतीला पोषक असा कोणता धर्म राहिल? याच्या शोधात बाबासाहेब होते. खिश्चन, मुस्लिम, शिख, बौध्द, जैन या सर्व धर्माचा अभ्यास त्यांनी केला. अस्पृश्यांच्या उन्नतीबरोबरच बाबासाहेबांना देशाचीही चिंता होती हेही लक्षात घ्यावे लागेल. देशाच्या विकासाला धोका निर्माण होईल असे धर्मातर त्यांना नको होते त्यामुळेच कोणत्याही प्रकारची विषमता नसलेल्या, समतेची शिकवण देणाऱ्या आणि देशाची जागतिक पातळीवर महानता वाढवणाऱ्या बौध्द धम्माचा स्विकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पत्नी डॉ. माईसाहेब यांच्यासोबत दिल्लीच्या बिर्ला बौध्द विहारात २ मे १९५० साली केला.
आणि नंतर १४ ऑक्टोबर १९५६ ला सुमारे ५ लाख लोकांना सोबत घेऊन नागपूर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेतली इतर धर्माकडून अस्पृश्यांच्या आर्थिक उन्नतीचे आश्वासन मिळून देखील बाबासाहेबांनी इतर कोणताच धर्म अनुसरला नाही. कारण त्यांना अस्पृश्यांची फक्त आर्थिक उन्नती करणे महत्वाचे वाटत नव्हते तर शतकांनुशतकापासून मुक राहिलेल्या, दुबळ्या मनाच्या स्वत्वाचे भान नसलेल्या, अंधकारमय जीवन जगणाऱ्या या लोकांची आत्मीक उन्नती करायची होती. आत्मभान जागृत करायचे होते. म्हणून मानवी मनाचा विचार करणाऱ्या, मानसालाच सर्वश्रेष्ठ माणनाऱ्या बौध्द धम्माचा स्विकार त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातर केल्यानंतर आणि बौध्द धम्म स्विकारल्यानंतर धम्म प्रचार आणि प्रसारासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. काही काळातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले.
अस्पृश्यांना धर्मातरीत केल्यानंतर भारत बौध्दमय करण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या अनुयायांनी फारसे गंभीरपणे घेतले नाही. म्हणूनच, “धर्म बदलणे म्हणजे घर किंवा वसा नव्हे की जे मन मानेल त्यावेळी बदलता येते” ही म. गांधीजींची प्रतिक्रीया सत्य ठरली हे खेदाने मान्य करावे लागते. व्यक्तिच्या मनावर इतर कुठल्याही समाजसंस्थेपेक्षा धर्मसंस्थेचे संस्कार खोलवर रुजत असतात. धर्म संस्कृतिच्या संस्कारानेच व्यक्तिचा स्वभाव निश्चित होत असतो म्हणूनच व्यक्तिमनाच्या सर्वागीन उन्नतीसाठी बाबासाहेबांनी धर्माचे अस्तित्व मान्य करून पराकोटीच्या आत्मविश्वासाने धम्माचा सन्मार्ग दिला. आपण धर्मातरीत झालोत पण संस्कारीत झालोत काय? याचा विचार करणे आगत्याचे आहे.
कोणताही धर्म हा त्याच्या संस्कृतिवरुन लक्षात येतो. मुस्लिम, शिख, जैन, खिश्चन या धर्माची माणसे त्यांची भाषा, संस्कृती व वर्तनावरुन लक्षात येतात तसे धर्मातरीत बौध्द आचरणातून लक्षात यावेत तसे येत नाहीत याची कारणे काय? याचा आपण शोध घेतला पाहिजे. मानव स्वतःवर व समुदायावर काही एक संस्कार करुन एक जीवनपध्दती निर्माण करतो. या पध्दतीलाच संस्कृती म्हणतात निती, कायदा, विद्या, कला, वाङमय आणि भाषा हे संस्कृतिचे अंग आपण अंगीकारण्याऐवजी कधी कधी वसा परिधान केले इथेच गफलत झाली. धर्मातर केल्यानंतर धम्माची संस्कृती समाजमनात रुजवण्यासाठी, एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मोठया प्रमाणात बौध्द विहार.
विपश्यना केंद्रे स्थापन करुन प्रशिक्षीत भिक्कू संघ निर्माण करुन प्रत्येक बौध्द विहार हे संस्कार केंद्र तयार करणे गरजेचे होते, आणि ही जबाबादारी धर्मातरीत समाजातल्या सुशिक्षीत लोकांची होती. परंतु सुशिक्षीत लोकांनी आंबेडकरी चळवळीला सुरवातीपासूनच म्हणावे तसे योगदान दिलेले नाही. हे वस्तव स्विकारावे लागते. गेल्या दोन दशकात स्थापन झालेल्या बहुजन हिताय संघ आणि जोशाबा या सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संघटना काही प्रमाणात सुाबध्द पध्दतीने रचनात्मक कार्य करताना दिसत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या अधिष्ठानातून निर्मिलेल्या संघटनांचे कार्य त्यांची पंचसुत्री योजना पाहिल्यास लक्षात येते.
समाज आणि तिच्या संस्कृतिच्या संर्वंकष परिवर्तनाचा जागर ही मंडळी करताना दिसते. हे निश्चिचत गौरवास्पद आहे. डॉ. बाबासाहेबांनी देशातल्या शोषित आणि बहिष्कृत समाजाला शिका ! संघटीत व्हा! संघर्ष करा! ही त्रिसूत्री जशी दिली होती तशीच स्थलांतर, धर्मातर, नामांतर ही त्रिसूत्रीही त्यांना आपेक्षीत होती. या त्रिसूत्रीमागे त्यांची व्यापक अशी भूमिका होती. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जातीयता आणि अस्पृश्यता तीव्रपणे पाळली जाते. शहर हे औद्योगीकरण, शिक्षण याचे केंद्र असल्यामुळे जातीयता आणि अस्पृश्यतेच्या तीव्रतेची आच कमी असते त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात व्यक्तिचा सर्वागिण विकास करण्यास पोषक असे वातावरण असते.
त्यामुळे संस्कृतीकरण करणे सोपे जाईल म्हणून बाबासाहेबांनी स्थलांतर करण्यास सांगितले होते. परंतु म्हणावे तसे स्थलांतर झाले नाही. पर्यायाने आजूनही ग्रामीण भागात शोषणाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणत सुरुच आहे. म्हणून शहरात स्थलांतर झालेल्या समाजाच्या तुलनेत ग्रामीण भागातील समाज शोषित आणि दरिद्रीच राहिला हे मान्यच करावे लागते. दुसरे सूत्र म्हणजे धर्मातर. डॉ. बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेच्या जोखडातून लाचारीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या जीवनमुल्यांचे केंद्र असणाऱ्या बौध्द धम्माचा पुरस्कार केला. धर्मातरीत झालेल्या आणि बौध्द धम्म स्विकारलेल्या आपण लोकांनी कार्यक्रम घेण्यापलीकडे काहीच करु शकलो नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मातर केले तेव्हापासून त्यांचे सर्व अनुयायी नवबौध्द म्हणून ओळखण्यात येवू लागले या दशकाच्या प्रारंभी महाराष्ट्र शासनाच्यावतीने होत असलेल्या जनगणनेत जातीचा उल्लेख करत असताना नवबौध्द समाज संभ्रमावस्थेत आहे. जातीचा उल्लेख न करावा तर जातीचा रकाना भरण्यासाठी जनगणना अधिकारी सक्ती करत आहेत आणि दुसरी अडचण म्हणजे आपल्या सोयी सवलती जातील की काय? ही भीती वाटत आहे म्हणून धर्मातरीत बौध्दांचीही हिंदू महार, नवबौध्द महार, बौध्द महार अशी जनगणनेत नोंद होताना दिसते. जातीविरहीत असलेल्या बौध्द धम्मात एक जात निर्माण होईल का ? असा प्रश्न पडतो. या गंभीर प्रश्नाकडे जर आपण डोळेझाक केली तर तथागत गौतम बुध्दांच्या नंतर बौध्द धम्माला एक दूषित स्वरुप प्राप्त झाले होते. कर्मकांड, अंधश्रध्दा या दुष्ट प्रवृत्तीचा शिरकाव झाला होता.
इ. स. च्या ८ व्या शतकात बौध्द धम्मात महायान. हीनयान, वज्रयान असे पंथ निर्माण झाले होते. तसेच एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महारयान पंथ निर्माण होऊ नये हे विव्दानांनी लक्षात घेणे महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित असलेले तिसरे सूत्र म्हणजे नामांतर होय. ‘मुंबई इलाखा महार परिषदेत १९३६ मध्ये केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मातराचे महत्व समजून सांगताना म्हणतात की, “तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय आहे? म्हणून विचारले तर तो चोखामेळा, हरीजन वगैरे नावे सांगतो पण महार हे नाव सांगत नाही.
पुढे बाबासाहेब म्हणतात. “मला तुम्हाला एवढेच विचारावयाचे आहे की, नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तर मग तुम्हाला धर्मातर करण्यास काय हरकत असावी. धर्मातर हे एका दृष्टिने नामांतरच आहे. आज हे नाव, उद्या ते नाव असे नामांतरे करीत बसण्यापेक्षा धर्मातर करून कायमचे नामांतर तुम्ही का करु नये? असा माझा तुम्हाला प्रश्न आहे.” उपरोक्त भाषणातून डॉ. बाबासाहेबांना स्पृश्यांच्या आणि आपल्याही दृष्टने दुर्गधीयुक्त असलेली आपल्या जातीची आणि आपली नावं पुर्णपणाने बदलावीत असे त्यांनी सूचित केले आहे. आणि धर्मातर केल्यावर असे पूर्ण नामांतर होईल असे त्यांना वाटत असावे.
परंतु तसे झाले नाही धर्मातरीत बौध्दांनी धर्मातर केल्यानंतर बौध्द धम्माच्या संस्कृतीतील नावे ठेवायला पाहिजे होती. ज्यांनी स्वतःची आडनावे बदलून दुसरी आडनावे ठेवली तीही ब्राहमणी मानसिकतेची, काळेगावकर, जवळगेकर, उंबरीकर इ. परंपरेने आलेली आडनावे बदलून बौद्ध संस्कृतीतील नावे आणि आडनावे ठेवली असती तर समाजाची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण झाली असती. सामाजिक एकोपा निर्माण होण्यासठीही निश्चितच फायदा झाला असता. कबिलदारी आजही जाच आणि उपजीविकेचा होणारा राजकीय फूटीरपणाही दिसली नसती.
बाबासाहेब महत्वाचा बदल म्हणजे जातिनिर्मूलन यासाठी झटले. त्यासाठी होऊ शकणारी एक सांस्कृतिक संस्था आधारित समाज निर्मिती होण्यास मदत झाली असती. आंबेडकरी धर्मांतरित बौद्धांमध्ये उपजाती तंतोतंत पाळल्या जातात. त्यांना एकमेकांशी वेढा व्यवस्थित नाही. एखादा कांबळे किंवा वायमुळे आडनाव असणाऱ्याला आपल्या मुलाबाळांच्या विवाह कार्यात असलेली तर समाजाच्या व्यक्तीगत आणि त्याच्या पाहुण्यांच्या आडनावांचा शोध सुरू होत असतो. ही गोष्ट धर्मांतरानंतरची नाही मानसिकता त्यांची पाहून आज आपण उपजाती शोधतोयच असतो. म्हणून पूर्वपरंपरेंतला भार आजही आहे.
उपजाती शोधून शोधूनही असतील तर आपण धर्मांतरित झाल्यावर होणारी जाती उपजाती तितक्याच पाळत असले तर आपण धर्मांतरित झालो काय? जातीविरहित समाज निर्माण होण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारला असे म्हटले जाते. मानवतावादी विचार अंगीकारू मानणाऱ्या डॉ. बाबासाहेबांशी आपले नाते कसे सांगायचे? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. २१ व्या शतकात बौद्धधम्म, मानवधर्म, दिग्दर्शन, धर्मकृती या विद्वानांनी, द्वितीय झालेल्या बौद्ध धर्माची पुनर्प्रतिष्ठा केली.
देशातील हृदयस्थ झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन फुल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या संकल्पना निकोप असा धर्म अनुयायांना दिला. त्यांनी बौद्ध विचारांचा अभ्यास करता करता आणि अन्यथा ललाटाला माणूस केंद्रस्थानी ठेवला आणि धर्मांतरित बौद्धांना धर्म तत्त्वज्ञान समाजाचे म्हणून अमर्याद सोप्या भाषेत “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा मौलिक असा ग्रंथ लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तन्मयतेने केलेल्या परिश्रमाचे मोल आपण अनुयायांनी जपले पाहिजे. बौद्ध तत्वज्ञानाचा आणि विचारांचा अंगीकार आचरणात आणून विवेक, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या मूल्यभावांच्या वर्तनातून एक वैज्ञानिक अशी बौद्ध संस्कृती जोपासली पाहिजे.