मुंबई – स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास तयार आहे. या संदर्भात बोलणी करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने पक्षाचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांच्यावर सोपवली आहे.
४ फेब्रुवारी रोजी प्रियदर्शी तेलंग हे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी यांना भेटले. आगामी महानगर पालिका निवडणुकीत आघाडी करण्या संदर्भात त्यांनी तिवारी यांना प्रस्ताव दिला आहे. गोपाल तिवारी यांनीही काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे आघाडीचा प्रस्ताव नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले आणि प्रवक्ते गोपाल तिवारी यांच्यात काहीतरी कम्युनिकेशन गॅप असावी असे दिसते. नाना पटोले यांनी वंचितने दिलेल्या युतीच्या प्रस्तावा बाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली.