धुळे: काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे उद्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे ७०० कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्यामुळे भाजप (bjp) आणि काँग्रेस एकच असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काँग्रेसमध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या जबाबदारीवर असतानाही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, कुणाल पाटील यांचे वडील आणि आजोबा यांचाही राजकारणात दबदबा होता आणि पाटील घराणे हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. अशा परिस्थितीत कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या समर्थकांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्षबदलामुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...
Read moreDetails