शेकडो कार्यकर्त्यांचीही काँग्रेसला सोडचिठ्ठी
अकोला : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला वाढत असून, पातूर तालुक्याचे काँग्रेस उपाध्यक्ष मो. मुजीब मो. यासीन, उपसरपंच आळेगाव जलाउद्दीन जुलफुद्दीन यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत यशंवत भवन येथील निवासस्थानी वंचितमध्ये प्रवेश केला.
अकोला लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मुस्लिमविरोधी आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे संघटक म्हणून काम करणाऱ्या अभय पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे मुस्लिम समाजात नाराजी आहे. मुस्लिम समाजाने हा उमेदवार नको म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही पाटील यांना उमेदवारी दिली. याचा विरोध म्हणून काँग्रेसमधून राजीनामा देणाऱ्यांची संख्या वाढली असल्याची चर्चा अकोला शहरात आहे.
तसेच, दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम समाजासाठी केलेल्या आंदोलन आणि कार्यामुळे मुस्लिम समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचीच पावती म्हणून पातूरमधील काँग्रेस उपाध्यक्ष मो. मुजीब मो. यासीन, उपसरपंच आळेगाव जलाउद्दीन जुलफुद्दीन, मुलकोद्दीन सिराजोद्दीन, शेख रफीक शेख नंदू, मो. सऊद मो. अनीस, नसीरोरोद्दीन अनिसोद्दीन, मुनीर खान समशीर खान, फहोमोद्दीन खतीबोद्दीन, मो. वासीफुर रहमान, मो. यूसुफ मो. इक़बाल, मजीद शेख सलीम, रज्जाक खलील, मुख्तार खान, हुसैन खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.