Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

mosami kewat by mosami kewat
March 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; जाणून घ्या आजचे ताजे दर
       

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत होणाऱ्या सततच्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काल किमतीत घट झाल्याने सोन्याचे दर आणखी खाली येतील अशी आशा असतानाच, आज पुन्हा सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांपर्यंतची वाढ झाली असून, पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

नेमकी स्थिती काय?

काल सोन्याच्या दरात घट झाल्याने भाव आणखी खाली येतील, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र, आज अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सोन्याचे दर स्थिर नसल्याने नेमकी खरेदी कधी करावी, असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.

सोन्याचे दर वाढले

आज १४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,६२,३८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५६०रुपयांनी महागले असून १,२९,९०४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७००० रुपयांनी वाढले असून १६,२३,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,४८,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ५२० रुपयांनी महागलं असून हे दर १,१९,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी महागलं आहे.

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे ५३० रुपयांची वाढ झाली असून हे दर १,२१,७९० झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४२४ रुपयांनी वाढ असून हे दर ९७,४३२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ५,३०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १२,१७,९०० रुपये झाले आहेत.

सोन्याचे भाव सतत बदलत असल्याने सराफा बाजारात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गुंतवणूकदार दर घसरण्याची वाट पाहत असतानाच आज झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे आता खरेदी करावी की अजून थांबून राहावे? असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.

 


       
Tags: goldGold bankGold investmentGold price hikeGold rateMaharashtra
Previous Post

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकरी कर्जमाफी योजना

Next Post

RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश

Next Post
RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश

RTE प्रवेशातील '१ किमी' अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 
बातमी

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

by mosami kewat
March 30, 2026
0

खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे...

Read moreDetails
शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

March 30, 2026
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

March 30, 2026
पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

March 30, 2026
अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

March 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home