औरंगाबाद – प्रसिद्ध चित्रकार प्रा. दिलीप बडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बडे कुटुंबीयांची औरंगाबाद येथील घरी भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी प्रा. दिलीप बडे यांच्या पत्नी, दोन मुले आणि सून उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, योगेश बन, शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, माजी विरोधी पक्ष नेता मिलिंद दाभाडे, प्रा. प्रकाश शिरसाठ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे आदी उपस्थित होते.
“दलित युवक आघाडी-दयुआ”चे कार्यकर्ते आणि एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चळवळीतील चाहते, अंबाजोगाईचे (जि. बीड) प्रा. दिलीप बढे यांचे 5-6 फेब्रुवारी मध्यरात्री औरंगाबादला हृदय विकाराने निधन झाले.
*”दयुआ, नंतर भारिपचे नेते प्रा. एस. के. जोगदंड, प्रा. माधव मोरे सर, प्रा. अविनाश डोळस, प्रा. विश्वप्रकाश सिरसट यांचे दिलीप सहकारी. आंबडवे गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सर्व कलात्मक काम आणि म्युरल प्रा दिलीप बडे यांनी केली आहेत. त्यासाठी ते आंबडवे गावात जाऊन राहिले होते.
5 तारखेला रात्री 9 पर्यंत डॉ अविनाश आणि जॅकलिन डोळस यांची मुलगी आदितीच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभात प्रा. दिलीप बढे व त्यांच्या पत्नी सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर तीन तासांतच ही बातमी येणे हा धक्का होता.
एक चांगले चित्रकार, कला समीक्षक शिक्षक आणि प्रखर आंबेडकरवादी सहकाऱ्याला आपण मुकलो आहोत. बढे कुटुंबियांच्या दुःखात आंबेडकर कुटुंबीय, आंबडवे ग्रामस्थ, वंचित बहुजन आघाडी आणि प्रबुद्ध भारत परिवार सोबत आहोत. प्रा. दिलीप बढे यांच्या स्मृतींना “प्रबुद्ध भारत, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विनम्र अभिवादन!