अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने केली तक्रार
अकोला : सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असून, सगळीकडे वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला आहे. हे काही नेत्यांना खुपत असल्याने त्यांनी धमकी देणे आणि शिवीगाळ करण्याचे तंत्र अवलंबले असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातील काँग्रेसचा साजिद खान पठाण याने मुस्लिम समाजाचे मौलवी यांनी बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करण्याचे आवाहन का केले? या कारणावरून मुस्लिम समाजाचे मौलवी यांना शिवीगाळ केली. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी अपशब्द बोलून मुस्लिम समाजाचे मौलवी यांना फोनवरून धमक्या दिल्या.
यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, गजानन गवई, माजी सभापती आकाश शिरसाट, कलीम भाई, अक्रम भाई यांनी अकोला पोलिस अधीक्षक यांना साजिद खान पठाणवर त्वरित गुन्हे दाखल करुन अटक करण्यात यावी, यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याचबरोबर अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, जुने शहर पोलीस स्टेशन, डाबकी रोड पोलीस स्टेशन, अकोट फाइल पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाला असून साजिद खान फरार आहे.