Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस

mosami kewat by mosami kewat
May 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस
       
नागपूर : नागपूरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील असुविधांविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणाऱ्या एका विद्यार्थिनीला वसतिगृह प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित विद्यार्थिनीला ‘नोकरी करत असल्याचे’ कारण देत वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थिनीने हे आरोप फेटाळून लावत आपण केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इंटर्नशिप करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित विद्यार्थिनी ही गरीब शेतकरी कुटुंबातील असून नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आणि इतर विद्यार्थिनींनी वसतिगृहातील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. विशेषतः उन्हाळ्यात कुलरची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच विदर्भातील मुलींच्या वसतिगृहांसाठी सुमारे ६०० कुलर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यार्थिनीने दिली.

मात्र, तक्रार केल्यानंतर प्रशासनानेच दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. “आम्ही आमच्या अडचणी मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. पण त्यानंतर प्रशासनाने आमच्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणे योग्य नसल्याचे सांगितले. काही अडचण असेल तर समाजकल्याण विभागाकडे तक्रार करायला हवी होती, असेही सांगण्यात आले,” असा आरोप विद्यार्थिनीने केला. तसेच “जर इथे राहायचे नसेल तर घरी जा,” असेही प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.

दरम्यान, विद्यार्थिनीला बजावण्यात आलेल्या नोटिशीत ती नोकरी करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, “मी कुठेही नोकरी करत नाही. मी केवळ इंटर्नशिप करत आहे आणि तो माझ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्या प्रोजेक्टला गुण मिळतात, त्यामुळे ती करणे आवश्यक आहे,” असे स्पष्टीकरण विद्यार्थिनीने दिले आहे.

Tags: collegeHostelMaharashtranagpurNagpur newsPoliticalSavitribai Phule university
Previous Post

Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Next Post

NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

Next Post
NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home