Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 31, 2024
in बातमी
0
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !
       

उत्तर अमेरिकेतील ‘आंबेडकराईट असोसिएशनचा’ विशेष पुरस्कार प्रदान

चिपळूण : दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ अमेरिकेतील “आंबेडकराईट असोसिएशन ” या संस्थेचा 2024 सालचा विशेष पुरस्कार भारतातील सुप्रसिद्ध लेखक ज. वि. पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीत देण्यात आला .

आंबेडकराईट असोसिएशन ऑफ नोर्थ अमेरिका (AANA ) ही संस्था दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीस डॉ. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी ज. वि. पवार यांनी उद्दीपित केलेल्या चळवळीचा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा तसेच समाज उन्नयनासाठी दिलेल्या जगभरातील व्याख्यानांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे . हा पुरस्कार म्हणजे पवार यांनी प्रगल्भित केलेल्या आंबेडकरवादाचा सन्मान आहे. ज.वी. पवार यांनी आंबेडकरवादाची कधीही कास सोडली नाही. उभे आयुष्य त्यांनी केवळ आंबेडकरवादाची जपणूक केली आहे .

ज . वी. पवार यांची ग्रंथसंपदा मराठी, हिंदी, इंग्रजी व भारतातील अनेक प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध झाली असून अनेक विद्यापीठातील अभ्यासक त्यांच्या चळवळीवर व साहित्यावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांच्या कवितांचा आणि ग्रंथांचा समावेश अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आजही ते सतत क्रियाशील असून आंबेडकरवादी चळवळीत अत्यंत सक्रिय आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने अपरांत साहित्य कला प्रबोधिनी या साहित्य विषयक संस्थेचा उदय झालेला आहे. त्यांना मिळालेल्या या जागतिक पुरस्काराबद्दल आंबेडकरी चळवळीतून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


       
Tags: ambedkriteDalit PanthersdalitmovementJ.V.Pawar
Previous Post

मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ?

Next Post

आंबेडकरी विचारांशी प्रमाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही..!

Next Post
आंबेडकरी विचारांशी प्रमाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही..!

आंबेडकरी विचारांशी प्रमाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही..!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई विद्यापीठात भन्तेजींवर हल्ला; खोट्या गुन्ह्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचा संताप
Uncategorized

मुंबई विद्यापीठात भन्तेजींवर हल्ला; खोट्या गुन्ह्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचा संताप

by mosami kewat
September 18, 2025
0

मुंबई : मुंबई विद्यापीठात भंते मीमांसा यांच्यावर सुरक्षा रक्षक बाळासाहेब खरात व त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यामुळे बौद्ध समाजात प्रचंड रोष...

Read moreDetails
Latur : लातूरमध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने प्रवेश

Latur : लातूरमध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने प्रवेश

September 18, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी – सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शासनाकडे मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी – सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शासनाकडे मागणी

September 18, 2025
सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव  आंबेडकर

सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव आंबेडकर

September 18, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेणार भेट!

आंदोलन मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही : ॲड. प्रकाश आंबेडकर

September 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home