Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

Cheteshwar Pujara: पुजाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ची मोठी इनिंग संपली

mosami kewat by mosami kewat
August 24, 2025
in क्रीडा, बातमी
0
Cheteshwar Pujara: पुजाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ची मोठी इनिंग संपली
       

भारतीय क्रिकेटमधील ‘कसोटी स्पेशलिस्ट’ आणि संघाची ‘नवी भिंत’ म्हणून ओळखला जाणारा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात स्थान न मिळाल्याने, त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहून त्याने आपल्या १३ वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. पुजाराच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमधील एक संयमी आणि चिवट इनिंग संपली आहे.

सोशल मीडियावर भावूक पोस्ट

पुजाराने आपल्या निवृत्तीची घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वरून केली. त्याने लिहिले, “भारतीय संघाची जर्सी परिधान करणे, देशाचे राष्ट्रगीत आणि मैदानावर पाऊल ठेवताना मी प्रत्येक वेळी देशासाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. जसे म्हणतात की, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत निश्चित आहे, म्हणून मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

द्रविडनंतरची ‘नवी भिंत’

२०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या पुजाराने लवकरच भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. माजी कर्णधार राहुल द्रविडनंतर त्याला भारतीय कसोटी संघाची ‘नवी भिंत’ मानले जात होते. क्रीजवर टिकून राहण्याची त्याची क्षमता आणि संयमी फलंदाजी यामुळे अनेकदा त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होती.

पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

पुजाराने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ७ हजार १९५ धावा केल्या आहेत, ज्यात १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराने भारतासाठी फक्त ५ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने ५१ धावा केल्या. गेल्या काही वर्षापासून तो भारतीय संघातून बाहेर होता आणि आता त्याने आपल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली. त्याने अनेकदा आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताला कसोटी सामने जिंकून दिले. मात्र, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याला फारसे संधी मिळाल्या नाहीत. आता निवृत्ती जाहीर करून त्याने आपल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.


       
Tags: Cheteshwar PujaracricketindiaInternational cricketiplMatchplayerTest machWorld Cup
Previous Post

सिव्हिल हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे शीतल मोरे यांचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीचे जाहीर निदर्शने

Next Post

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – वंचित बहुजन आघाडीची मदतची मागणी

Next Post
वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – वंचित बहुजन आघाडीची मदतची मागणी

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – वंचित बहुजन आघाडीची मदतची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.
क्रीडा

IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.

by mosami kewat
October 31, 2025
0

ICC Women's World Cup 2025 : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील...

Read moreDetails
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 30, 2025
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025
बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home