सिन्नर येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक : सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरवातीला जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे व कार्यकारणीच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्माची सुरवात झाली.
कार्यक्रमा प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यकर्माचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका निरीक्षक प्रशांत अहिरे, जिल्हा प्रवक्ता बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संघटक दीपक भंडारे युवा महानगर प्रमुख रवी पगारे आदी उपस्थित होते.
पत्रकारांसोबत बोलतांना संघटन मजबूत करण्यासाठी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडू असे प्रतिपादन चेतन गांगुर्डे यांनी केले. कार्यकर्माचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष नाना पवार, योगेश वाघमारे यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यानी केले.