Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र व राज्य शासन जबाबदार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र व राज्य शासन जबाबदार – प्रा. अंजलीताई आंबेडकर
       

अकोला – वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने सांगळुद ता.जि.अकोला येथे तालुका मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामधील माहिती केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी पुरविली नसल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. याला केंद्र शासन व राज्य शासन जबाबदार आहे. भाजप व राज्यातील श्रीमंत मराठा समाज यांना ओबीसी आरक्षण नको आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे विरोधक कोण आहेत हे वेळीच ओळखले पाहिजे. ओबीसी समाजाने संघटित होऊन कायदेशीर लढा दिला पाहिजे. सोबतच निवडणुका नियोजनबद्ध पद्धतीने लढण्यासाठी प्रत्येक मतदानकेंद्रावर महिलांनी बुथ कमिटी स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन अंजलीताई आंबेडकर यांनी केले.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट होत्या या वेळी, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, जि. प. सदस्या पुष्पाताई इंगळे, महासचिव शोभाताई शेळके, प्रतिभाताई अवचार, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, पं. स. सभापती राजेश वावकार, उपसभापती आनंद डोंगरे यांची समायोचित भाषणे झाली. प्रास्तावीक ता.उपाध्यक्ष रेखा गोपनारायण यांनी केले सुत्रसंचलन ता.अध्यक्षा तथा पं स गटनेता मंगलाताई शिरसाट आभार प्रदर्शन ता.महासचिव उमा अंभोरे यांनी केले.कार्यक्रमाला जिप सदस्या निताताई गवई, संगीता ताई अढाऊ,पं. स. सदस्या छायाताई वानखेडे, आशाताई वानखडे, शोभाताई नागे, आशाताई निशानराव तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सुरेखा सावदेकर, मंदाताई वाकोडे, छायाताई तायडे तसेच तालुका पदाधिकारी विजया गोपनारायन, लक्ष्मी इंगळे, सीमा शिरसाट माजी जिप सदस्या सरलाताई मेश्राम, मंदाताई शिररसाट तसेच तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी, महिला सरपंच, महिला उपसरपंच तसेच तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या.


       
Tags: Anjalitai Ambedkarobc
Previous Post

मागासवर्ग आयोगाला बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ देण्यात आलाय ! – राजेंद्र पतोडे

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न.

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न.

वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बातमी

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by mosami kewat
October 30, 2025
0

परभणी : औरंगाबाद येथे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीने RSS कार्यालयावर 'जन आक्रोश मोर्चा' काढल्यानंतर सोशल मीडियावर बाळासाहेब...

Read moreDetails
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025
बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

October 30, 2025
अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव

अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home