Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

mosami kewat by mosami kewat
February 3, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित
       
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोठागदारोळ करण्यात आले. मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पाहायला मिळाला. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भावरून सुरू झालेला वाद थेट खासदारांच्या निलंबनापर्यंत पोहोचला. कागद भिरकावणे, घोषणाबाजी आणि गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा चीनची घुसखोरी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. सोमवारी त्यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत सरकारवर टीका केली होती. आज पुन्हा तोच संदर्भ देण्याचा प्रयत्न करताना, तालिका अध्यक्षांनी त्यांना रोखले. केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोला, अशी तंबी अध्यक्षांनी दिल्यानंतरही राहुल गांधींनी आपले भाषण सुरूच ठेवले. (Budget Session Ruckus 8 Congress MPs Suspended)

राहुल गांधींना बोलण्यापासून रोखल्याने काँग्रेस खासदार आक्रमक झाले. संतापलेल्या खासदारांनी तालिका अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावले, ज्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. या वर्तणुकीची गंभीर दखल घेत सरकारने आठ खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला, जो मंजूर करण्यात आला.

निलंबित झालेले खासदार:

१) प्रशांत पडोळे (महाराष्ट्र)

२) अमरिंदर सिंग राजा वारिंग

३) गुरदीप सिंग औजला

४) हिबी ईडन

५) मणकिम टागोर

६) किरण रेड्डी

७) वेंकट रमण

८) डीन कोरियाकोस

हे आठही खासदार आता उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. (Budget Session Ruckus 8 Congress MPs Suspended)

सभागृहात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी राहुल गांधींच्या भाषणावर वारंवार आक्षेप घेतले. दोन्ही बाजूचे खासदार आमनेसामने आल्याने सभागृहाचे वातावरण तापले होते. अखेर गोंधळ न थांबल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

Tags: CongressElectionmlaNew ParliamentParliamentPoliticalpolticsRahul GandhiVanchit Bahujan Aghadi
Previous Post

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित
Uncategorized

अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

by mosami kewat
February 3, 2026
0

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोठागदारोळ करण्यात आले. मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पाहायला मिळाला. माजी लष्करप्रमुख मनोज...

Read moreDetails
भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

February 3, 2026
११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

February 3, 2026
प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

February 3, 2026
कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन

कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन

February 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home