बार्शी : 2568 वी बुद्ध जयंती बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहार या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते बुद्ध पूजन सामूहिक बुद्ध वंदनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका संघटक ज्ञानदेव सोनवणे गुरुजी, प्रमुख पाहुणे माजी सरपंच सुधाकर मिरगणे, शुभम मिरगणे, बबन मिरगणे हे होते. ज्ञानदेव सोनवणे गुरुजी आणि सम्यक सोनवणे यांचा सत्कार ग्राम शाखेच्या वतीने करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार शाखेच्या महिला पदाधिकारी मंगल सोनवणे, काजल सोनवणे, उर्मिला सोनवणे, शीला जावळे, साधना सोनवणे, मामा जावळे, शोभा सोनवणे यांनी बाबासाहेबांचे 13 वा खंड पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.पंचशील उपकरणे आणि निळी टोपी देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र सोनवणे, दादा सोनवणे, आप्पा सोनवणे, गौतम सोनवणे यांनी सत्कार केला.
परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी सानिका सोनवणे, प्रांजली जावळे, वैष्णवी सोनवणे यांचे बाबासाहेबांचा तेरावा खंड देऊन अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा मांडेगाव अध्यक्ष रामभाऊ सोनवणे यांनी केले तसेच शाखेच्या वतीने उत्तरेश्वर सोनवणे यांनी आभार मानले.
या वेळी सुखदेव सोनवणे, भारत डावरे, साहेबराव डावरे, माणिक सोनवणे तसेच आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. जय भीम बुद्ध विहार मांडेगाव बार्शी तालुक्यामध्ये बुद्ध धर्माचे प्रचार प्रेरणास्थान बनत आहे. शाखेची पुढील वाटचाल वाचनालयाकडे आहे.