मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या एकापाठोपाठ एक तीन फोन कॉल्सने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडवून दिली. अज्ञात कॉलरने मोठा स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याने तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.
धमकीचे कॉल येताच, मुंबई पोलिसांचे पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांनी विमानतळाचा टर्मिनल २ परिसर पूर्णपणे रिकामा करून कसून तपासणी मोहीम राबवली. अनेक तास चाललेल्या या शोध मोहिमेनंतरही कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्बसदृश काहीही आढळून आले नाही. यामुळे बॉम्बची ही धमकी केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की हे धमकीचे कॉल आसाम आणि पश्चिम बंगाल सीमेवरील सक्रिय मोबाईल क्रमांकांवरून करण्यात आले होते. मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आणि त्यांच्या मागचा हेतू शोधून काढण्याचे प्रयत्न पोलिस करत आहेत.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails