Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

mosami kewat by mosami kewat
February 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

       

एल अल्टो (बोलिव्हिया): बोलिव्हियातील एल अल्टो शहरात शनिवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) एका भीषण विमान अपघाताने खळबळ उडाली आहे. बोलिव्हियन वायूसेनेचे ‘हर्क्युलस’ विमान धावपट्टीवरून घसरून महामार्गावर कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानातून मध्यवर्ती बँकेच्या नवीन नोटांची वाहतूक केली जात होती.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या (सेंट्रल बँक) नवीन नोटा घेऊन हे विमान निघाले होते. मात्र, एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करत असताना खराब हवामानाचा फटका बसला. विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवरून घसरून थेट जवळच्या गजबजलेल्या रस्त्यावर जाऊन धडकले. (BoliviaPlaneCrash)

विमान रस्त्यावर कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या १० ते १५ कार विमानाखाली दबल्या गेल्या. धडक इतकी जोरात होती की अजस्त्र हर्क्युलस विमानाचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर विमानातील नोटांचे बंडल रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातानंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले.

बोलिव्हियन वायूसेनेने या वृत्ताला दुजोरा दिला असून, जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय एअरलाइनने स्पष्ट केले की, दुर्घटनाग्रस्त विमान त्यांच्या ताफ्यातील नसून ते बोलिव्हियन एअर फोर्सचे विमान होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. अपघातामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. (BoliviaPlaneCrash)

बोलिव्हियाची सेंट्रल बँक आज या घटनेवर अधिकृत पत्रकार परिषद घेणार आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आले आहे. प्रशासन मृतांची ओळख पटवण्याचे आणि नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम करत आहे.


       
Tags: AirDisasterAirportAccidentAviationAccidentBolivianAirForceBoliviaNewsBoliviaPlaneCrashCentralBankCrashInvestigationElAltoCrashEmergencyResponseHerculesAircraftPlaneCrashSouthAmericaNewsTragicIncident
Previous Post

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Next Post

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

Next Post
मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू
Uncategorized

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

by mosami kewat
April 10, 2026
0

अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राष्ट्रपतींकडे तडकाफडकी राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails
राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

April 10, 2026
आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

April 9, 2026
क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

April 9, 2026
राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home