बीड : बीड शहरातील धानोरा रोडच्या दयनीय अवस्थेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज अनोखे ‘होडी चलाव’ आंदोलन आणि ‘खड्ड्यांचे नामकरण सोहळा’ आयोजित केला होता. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मधोमध साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून या आंदोलनाची सुरुवात केली, ज्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांनी तयार झालेल्या ‘तलावांचे’ विदारक चित्र समोर आले.
आंदोलकांनी धानोरा रोडवरील मुख्य खड्ड्यांमध्ये खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे फोटो लावून खड्ड्यांना ‘नावे’ दिली आणि त्यांचा ‘सन्मान’ केला. जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर वंचित बहुजन आघाडीने या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनामुळे धानोरा रोडच्या डांबरीकरणाची आणि दुरुस्तीची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सहसंघटक अर्जुन जंजाळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेश कुमार जोगदंड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, महिला जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई तुरुकमाने, ता. किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन जोगदंड, संदीप जाधव, आकाश साबळे, शेख पाशाभाई, प्रकाश उजगरे, प्रदीप खळगे, राजाभाऊ घोषीर, सतीश क्षीरसागर, अभिजित बनसोडे, आप्पा पवार, मिलिंद सरपते यांच्यासह व्यापारी आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लातूर-धाराशिव वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन
लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetails