Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीडमध्ये ‘होडी चलाव’ आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
July 26, 2025
in बातमी
0
बीडमध्ये 'होडी चलाव' आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बीडमध्ये 'होडी चलाव' आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

       

बीड : बीड शहरातील धानोरा रोडच्या दयनीय अवस्थेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज अनोखे ‘होडी चलाव’ आंदोलन आणि ‘खड्ड्यांचे नामकरण सोहळा’ आयोजित केला होता. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मधोमध साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून या आंदोलनाची सुरुवात केली, ज्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांनी तयार झालेल्या ‘तलावांचे’ विदारक चित्र समोर आले.
‎
‎आंदोलकांनी धानोरा रोडवरील मुख्य खड्ड्यांमध्ये खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे फोटो लावून खड्ड्यांना ‘नावे’ दिली आणि त्यांचा ‘सन्मान’ केला. जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर वंचित बहुजन आघाडीने या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली.
‎
‎या आंदोलनामुळे धानोरा रोडच्या डांबरीकरणाची आणि दुरुस्तीची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
‎
‎या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सहसंघटक अर्जुन जंजाळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेश कुमार जोगदंड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, महिला जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई तुरुकमाने, ता. किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन जोगदंड, संदीप जाधव, आकाश साबळे, शेख पाशाभाई, प्रकाश उजगरे, प्रदीप खळगे, राजाभाऊ घोषीर, सतीश क्षीरसागर, अभिजित बनसोडे, आप्पा पवार, मिलिंद सरपते यांच्यासह व्यापारी आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‎


       
Tags: Dhanora Roadprotestvbaforindia
Previous Post

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा

Next Post

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे ‘थाळी बजावो’ आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

Next Post
कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home