Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे ‘थाळी बजावो’ आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 26, 2025
in बातमी
0
कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

       

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) हिंगोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ‘थाळी बजावो’ आंदोलन केले. दीड वर्षांपासून तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत चौकशी अहवाल सादर करून दोषींवर कारवाई न झाल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
‎
‎कळमनुरी तालुक्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत ठिबक आणि तुषार सिंचन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. एकाच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी दाखवणे, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सारखेच CM/L नंबर आणि बॅच नंबर वापरून शेतकऱ्यांची फसवणूक करणे, असे गैरव्यवहार झाल्याचा ठपका वंचित बहुजन आघाडीने ठेवला आहे. दीड वर्षांपूर्वी या संदर्भात तक्रार देऊनही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.
‎
‎२९ सदस्यीय समिती गठीत; १०० टक्के तपासणीचे आश्वासन
‎
‎आंदोलनानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी २९ सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. ही समिती कळमनुरी तालुक्यातील संपूर्ण प्रकरणाची १०० टक्के ‘जायमोका’ तपासणी करून कारवाई करेल, असे आश्वासनही देण्यात आले. कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
‎
‎१५ ऑगस्ट २०२५ अंतिम मुदत
‎
‎वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, जर १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत या गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई झाली नाही, तर पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल. या आंदोलनामुळे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
‎
‎यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्योतिपाल रणवीर, योगेश नरवाडे, राजकुमार इंगोले, सिद्धोधन गायकवाड, निखिल कव्हाने, यशवंत नरवाडे, संतोष इंगोले, जयभीम डोंगरे, रोहन पंडित, शकील पठाण, मोहम्मद अस्लमभाई, अक्षय इंगोले, काशिनाथ साळवे, अमोल खंदारे, कान्हेगाव शा.अ. धम्मपाल पाईकराव, आडा शा.अ. विनोद ढेपे, बऊर शा.स. दादाराव खंदारे, मुकिंदा ढेपे, अमोल पुंडगे, सामाजिक कार्यकर्ते नचिकेत वाढवे, दिनेश पाईकराव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
‎
‎


       
Tags: HingoliKalambnuriprotestvbaforindia
Previous Post

बीडमध्ये ‘होडी चलाव’ आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

Next Post
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!

by mosami kewat
November 13, 2026
0

औरंगाबाद : वैजापूर येथील रोहित अनिल पठारे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्यांची समाज...

Read moreDetails
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

November 12, 2026
आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

November 12, 2026
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

November 10, 2026
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home