औरंगाबाद : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकता नगर प्रभाग क्रमांक 1 येथे अभिवादन कार्यक्रम तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून महापुरुषांना अभिवादन अर्पण केले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तैय्यब जफर, पोलीस निरीक्षक सविता केदार (हारसुल), माजी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बकले, पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे, महिला शहराध्यक्ष पूर्व-मध्य वंदना नरवडे, पश्चिम शहर महिला अध्यक्ष साधना पठारे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे मनोबल वाढवले.

तसेच शहरातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते – एस. पी. मगरे, अजय मगरे, पुरुषोत्तम दाभाडे, शहर संघटक आनंद शेजुळ, मध्य महासचिव अनिल अंभोरे, बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा प्रचारक प्रकाश बोर्डे, बौद्धाचार्य नागेश जाधव, कुणाल गायकवाड, रवींद्र वाघ, दिलीप नरवडे, पंडितराव तुपे, गोकुळ भुजबळ, शहर उपाध्यक्ष मुंजाभाऊ तूप, समुद्र, गणेश बकले, उमेश सरदार, संजय बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक उपक्रमावर जातीयवादाची काळी छाया ! स्कॉलरशिपसाठीच्या तयारीपरीक्षेत विचारला वर्णव्यस्थेचे समर्थन करणारा प्रश्न
वार्डातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि महिला-पुरुष कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून रक्तदान शिबिर यशस्वी केले. सामाजिक सलोखा, मानवता आणि आंबेडकरी विचारांची प्रेरणा यामुळे रक्तदानाची ही चळवळ प्रभावीपणे राबविण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन मिलिंद बोर्डे ( वंचित बहुजन आघाडी मध्य शहराध्यक्ष) यांनी केले होते.






