भंडारा : महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. भाजपकडून भंडारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपच्या एका महिला उमेदवाराने अवमान केल्याची घटना आहे. महाराजांच्या जिरे टोपवर टोपी आणि गळ्यात भाजपच प्रचाराचा मफलर टाकण्यात आला आहे. हे बघून जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आहे. याचपार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांकात प्रचार करताना दिसताहेत. पण हे सर्व सुरु असताना भंडाऱ्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये एका महिला भाजप उमेदवाराने प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचे पाहण्यास मिळत आहे.
या घटनेने शिवप्रेमींकडून तसेच वेगवेगळ्या घटकातून टीका करण्यात येत आहे. त्यांच्या भावना दुखावले गेल्याचे सांगत आहे. ही घटना महाराष्ट्रात घडणे हे लज्जास्पद घटना आहे. महिला उमेदवारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी समाजातून केली जात आहे.





