ॲड. प्रकाश आंबेडकर : आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न सुरू
अकोला : भाजप आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत. या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीमविरोधी पक्षांना वंचितची ताकद समजली आहे. त्यामुळे मला आणि आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न सुरू असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आंबेडकर म्हणाले, त्यांच्या भीतीवरुन दिसून येत आहे की, वंचित बहुजन आघाडी किती मोठी ताकद आहे. त्यांच्या भीतीवरुन दिसून येते की वंचित बहुजन आघाडीचा त्यांनी किती धसका घेतला आहे. त्यांच्या भीतीमधून स्पष्ट होत आहे की, वंचित आणि उपेक्षितांचा आवाज बुलंद करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे.
या सोबत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एका मुलाखतीचा व्हिडिओ देखील जोडला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याचे म्हटले आहे.