पुणे : पुणे येथील रहिवासी प्रदीप बापू जगताप यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त जगताप परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून वैचारिक चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकास २५ हजार रुपयांचे धम्मदान करण्यात आले.
या निमित्ताने नम्रता टेकाळे आणि अक्षय प्रदीप जगताप यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आदरणीय अंजली आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी अंजली आंबेडकर यांनी प्रदीप बापू जगताप यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच जगताप परिवाराच्या या सामाजिक व वैचारिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
“समाजात वैचारिक प्रबोधन करणाऱ्या माध्यमांना पाठबळ देणे ही आजच्या काळाची गरज आहे,” अशी भावना यावेळी जगताप परिवाराकडून व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे समाजातील विविध स्तरांतून प्रदीप बापू जगताप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





