पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत आघाडीने (NDA) विजय मिळवला आहे. अपेक्षेहून अधिक कामगिरी करत, सत्ताधारी आघाडीने एकूण २४३ पैकी २०० हून अधिक जागा जिंकून मोठी मुसंडी मारली आहे.
दुसरीकडे, राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाआघाडीचा दारूण पराभव झाला असून, त्यांना ४० चा आकडाही गाठता आलेला नाही, ज्यामुळे विरोधी पक्षांची स्थिती अत्यंत वाईट झाली.
लोकजनशक्ती पार्टीचा (रामविलास पासवान) स्ट्राइक रेटही प्रचंड प्रभावी ठरला. निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा यंदाच्या निवडणुकीत दारूण पराभव झालाय.





