Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भीमा कोरेगाव आयोगाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्देश!

mosami kewat by mosami kewat
August 30, 2025
in बातमी
0
भीमा कोरेगाव आयोगाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्देश!

भीमा कोरेगाव आयोगाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्देश!

पुणे : भीमा कोरेगाव दंगली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 24 जानेवारी 2020 रोजी दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रे 22 सप्टेंबर 2025 रोजी दाखल करावीत, असे निर्देश भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने नुकतेच दिले आहेत.

शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते की, “भीमा कोरेगावची ही दंगल म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता. फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर करून दंगल घडवून आणली. दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घालण्यात आले. पोलिसांनी पुरावे मोडून-तोडून सादर केले. सरकारने पोलिसांच्या मदतीने कट रचून राज्यातील जनतेची फसवणूक केली.”

या पत्रात शरद पवार यांनी दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. आयोगासमोर शरद पवार यांच्या वकिलांनी हजेरी लावून, सदर पत्र पवार यांच्याकडे उपलब्ध नसल्याचा लेखी जबाब दिला होता, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी, सदर पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपलब्ध असल्यास ते आयोगाकडे मागविण्यात यावे, अशी विनंती ॲड. किरण कदम यांच्या मार्फत केली. ही विनंती आयोगाने मान्य केली असून, उद्धव ठाकरे यांना सदर पत्र व संबंधित कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Tags: Bhima KargaonCommissionKargaonpuneSharad PawarUddhav Thackeray
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेणार भेट!

Next Post

अकोला शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या मदतीची मागणी!

Next Post
अकोला शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या मदतीची मागणी!

अकोला शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या मदतीची मागणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार
बातमी

ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार

by mosami kewat
February 12, 2026
0

ओडिशा : एकीकडे देश प्रगती आणि समानतेच्या गप्पा मारत असताना, ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातून सामाजिक विषमतेचे एक धक्कादायक चित्र समोर आले...

Read moreDetails
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

February 12, 2026
छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

February 12, 2026
मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

February 12, 2026
पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

February 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home