धाराशिव : धाराशिव शहरातील नामांकित सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब प्रल्हाद नागटिळे यांनी आज वंचित बहुजन आघाडी पक्षात अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या हस्ते पार पडला.
नागटिळे यांच्या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला धाराशिव शहरात संघटनात्मक बळ मिळणार आहे, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या कार्यासाठी सक्रिय होणार असल्याचेही सांगण्यात आले.
‘साडी’वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार
या प्रसंगी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी परिवाराच्या वतीने भैय्यासाहेब नागटिळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद
नांदेड : आगामी नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, आज पार पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला उमेदवारांचा अभूतपूर्व...
Read moreDetails






