बीड : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जागरण गोंधळ करत पाटोदा तहसील कार्यालयापर्यंत एका मोठ्या प्रमाणावर पायी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले, ज्यात आघाडीच्या कार्यकत्यांनी ९ प्रमुख मागण्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलन केले. (Beed News)
जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेघडंबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शांततेत आणि संयमाने पार पडले. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन वर्गाशी संबंधित विविध सामाजिक व आर्थिक समस्या मांडण्यात आल्या. आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये खराब जमिनींची दुरुस्ती, पंतप्रधान घरकुल योजनेतील हप्त्यांचे वेळेवर वितरण, श्रमिक श्रवणबाळ व निराधार लाभार्थ्यांचे मानधन वेळेवर देणे, घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे वाटप, तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांमधील बोगस कामांची गंभीर चौकशी व त्यावर कठोर कारवाई यांचा समावेश होता. (Beed News)
तसेच, पाटोदा तालुक्यातील दलित वस्तीतील सार्वजनिक बांधकामांची वेळोवेळी चौकशी करून भ्रष्टाचार रोखण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. या मागण्यांवर प्रशासनाकडून त्वरित लक्ष दिले जाण्याचे आदेश आंदोलनात नमूद करण्यात आले. 
तहसील कार्यालयाने आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेत, संबंधित विभागांना पत्रे व स्मरणपत्रे पाठवून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. काही प्रकरणांत वरिष्ठ कार्यालयाकडे समिती स्थापन करण्यासाठी पाठविण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. (Beed News)
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.
ICC Women's World Cup 2025 : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील...
Read moreDetails 
			 
					

 
							




