जालना – मंठा तालुक्यातील सरकटे वझर ते वाटूर या मार्गावर बेलोरा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा आढळून आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून पोलखोल केली. (Jalna Road Construction)
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाहणी दौऱ्यात आढळून आले की, सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्यात दर्जात्मक कसूर, निकृष्ट साहित्य व निकृष्ट बांधकाम पद्धती वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात मंठा-परतूर-नेर-सेवली मतदारसंघात अशा प्रकारची अनेक बोगस कामे कार्यकारी अभियंता व स्थानिक आमदार बबन लोनीकर यांच्या संगनमताने करण्यात आली असल्याचा आरोप दीपक डोके यांनी केला. लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन संबंधित अभियंते, ठेकेदार व आमदार बबन लोनीकर (MLA Babanrao Lonikar) यांच्या विरोधात लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. (Jalna Road Construction)
या पाहणी दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश खरात, रंजीत चव्हाण, सुरज गवळी, प्रकाश खाडे, दिलीप मगर, शरद वाघमारे, सचिन वाघमारे, बंडू कोरडे, विष्णू मुंडे, नवनाथ मुंडे, अनिल मुंडे, सुनील गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांमध्येही या रस्त्याच्या कामाबाबत तीव्र नाराजी असून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. वंचित बहुजन आघाडीने हा भ्रष्टाचार उघड केल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...
Read moreDetails






