बीड : बीड येथे बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे झाल्याची घक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक सुरक्षेची गंभीर स्थिती दिसत आहे. मागील पाच महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे तर 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील पाच महिन्यांत एकूण बलात्काराच्या घटनांमध्ये 49 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत. पोलिस तपासात धक्कादायक बाब उघडकीस आला आहे. गुन्ह्यांमध्ये अनेक घटना हे परिचित व्यक्ती, शिक्षक किंवा शेजाऱ्यांकडून झाल्याचं समोर आलं आहे.
बीड जिल्ह्यात ५ महिन्यांत ४२ अत्याचाराचे गुन्हे बीडमध्ये ‘नीट’ कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षक आणि संचालकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांत जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) ७८ गुन्हे दाखल झाले. यापैकी ४२ प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला, तर ३६ विनयभंगाशी संबंधित आहेत.
या आकडेवारीमुळे अल्पवयीन मुलींच्या लैंगिक सुरक्षेची गंभीर स्थिती दर्शवते. पालक, शिक्षक, प्रशासन आणि पोलिसांसमोर या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. 2024 मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत जिल्ह्यात बलात्काराचे 65 गुन्हे नोंद झाले होते.
यंदा यामध्ये 23 गुन्ह्यांची वाढ होऊन 85 गुन्हे झाले आहेत. तर विनयभंगाच्या 197 गुन्ह्यांची गतवर्षी नोंद होती, यामध्ये 12 टक्क्यांनी वाढ होऊन 209 गुन्हे नोंद झाले आहेत. या आकडेवारीवरून महिलांप्रमाणेच अल्पवयीन मुलींच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्येही चिंताजनक वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.
बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना
अकोला : बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे येत्या 5...
Read moreDetails