बीड : बीड शहरातील यश ढाका (वय २२) या तरुणाच्या कुटुंबियांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
माने कॉम्प्लेक्स भागात २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात सहा ते आठ जणांनी गजबजलेल्या ठिकाणी लोकांसमोर यश ढाका याच्या पोटात चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केली होती. या धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली होती.
पीडित कुटुंबियांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेनंतर यश ढाका यांच्या कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी ॲड. आंबेडकर यांच्यासोबत अंजलीताई आंबेडकर देखील उपस्थित होत्या.
ॲड. प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी यश ढाका यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी वकिलांशी फोनवर संवाद साधून माहिती घेतली.