Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 28, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

       

आरोपींना तात्काळ अटक करा, जातीय रंग देऊन नका – वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांचे आवाहन!

बीड – बीड शहरातील एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ दरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, प्रशांत खाटोकर व विजय पवार या दोघांनी पीडितेला वारंवार वर्गानंतर केबिनमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचे आरोप आहेत. तसेच, तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे पीडितेला तीव्र मानसिक धक्का बसला असून, तिने ही माहिती पालकांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी POCSO कायदा आणि भारतीय दंडविधानातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत, ही चिंतेची बाब आहे. दरम्यान, विजय पवार हे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींशी जवळचे संबंध ठेवणारे, तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संपत्ती उभी केल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय व आर्थिक दबावामुळे चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाकडे मी मागण्या करण्यात येत आहेत. दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी प्रकरणाची जलद, निष्पक्ष चौकशी करावी. पीडितेला मानसिक, वैद्यकीय व कायदेशीर मदत द्यावी.

या प्रकरणाला जातीय वा सामाजिक रंग देण्याचे प्रयत्न रोखावेत, कोचिंग क्लासेसवर सुरक्षा नियमावली लागू करून अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे याप्रकरणी तात्काळ, ठोस व निष्पक्ष कारवाईची मागणी होत आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम वीर, सहसंघटक अर्जुन जंवजाळ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, बीड शहर अध्यक्ष लखन जोगदंड, मिलिंद सरपते, प्रकाश उजगरे, प्रदीप खळगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: beedcoachingcrimestudent
Previous Post

Nashik : प्रभाग रचना राजकीय फायद्यासाठी नको; वंचित बहुजन आघाडीचा आयुक्तांना इशारा

Next Post

अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी

Next Post
"अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी"

अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

by mosami kewat
January 21, 2026
0

संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी...

Read moreDetails
नांदेडमध्ये बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीला वंचितने केले नगरसेवक !

नांदेडमध्ये बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीला वंचितने केले नगरसेवक !

January 21, 2026
वंचित बहुजन युवा आघाडीच्या लढ्याला मोठे यश; शीतल मोरे मृत्यू प्रकरणातील चौकशीला वेग

वंचित बहुजन युवा आघाडीच्या लढ्याला मोठे यश; शीतल मोरे मृत्यू प्रकरणातील चौकशीला वेग

January 21, 2026
पुणे जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी साथ साथ, ७३ जागांवर एकत्रित लढत !

पुणे जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी साथ साथ, ७३ जागांवर एकत्रित लढत !

January 21, 2026
जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!

जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!

January 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home