Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळापुरात घरकुल लाभार्थ्यांचा ‘मेळावा’ यशस्वी..!

mosami kewat by mosami kewat
February 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बाळापुरात घरकुल लाभार्थ्यांचा ‘मेळावा’ यशस्वी..!
       

१८० हून अधिक कुटुंबांचे घराचे स्वप्न मार्गी!

बाळापूर : घरकुल मंजूर होऊनही विविध तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या हप्त्यांच्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांसाठी मंगळवारचा दिवस आशादायी ठरला. पंचायत समिती बाळापूर येथे आयोजित विशेष ‘घरकुल कॅम्प’मध्ये तब्बल १८० हून अधिक कुटुंबांच्या अडचणींचे जागेवर निराकरण करण्यात आले.

बाळापूर पंचायत समिती अंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुल कामे तांत्रिक कारणास्तव प्रलंबित होती. आधार कार्ड लिंकिंग, जॉब कार्डमधील त्रुटी किंवा बँक पासबुकमधील विसंगती यामुळे हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मंगळवारी (ता. १७) रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा भव्य कॅम्प घेण्यात आला. यामध्ये १८० लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्रुटी दूर करवण्यात आल्या. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कॅम्पपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. मोठ्या प्रमाणात झालेल्या उपस्थितीमुळे प्रशासनालाही प्रत्यक्ष समस्यांचे गांभीर्य लक्षात आले. (Vanchit bahujan aghadi)

गटविकास अधिकारी बंडू नाना पजई यांनी  पूर्णवेळ उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्यासोबत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संदीप आगळे, विस्तार अधिकारी (कृषी) पुरुषोत्तम नाकट आणि स्थापत्य अभियंता साक्षी इंगळे यांनी तांत्रिक बाजू हाताळल्या. तसेच घरकुल विभागाचे पवन पाटील, शशीपाल हरणे, निखिल गव्हाणकर, कोमल आगरकर, नयना नेमाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कागदपत्रांची जलद गतीने पूर्तता केली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये राजकुमार दामोदर, रामकृष्ण सोनटक्के, निलेश इंगळे, सुगत डोंगरे, धर्मेंद्र दंदि, निरंजन शिरसाठ, विजय पातोडे,अमोल वसंत वानखडे, निशीकांत सरदार, जय तायडे, सुरज दामोदर, सचिन शिराळे, शुभम नाईक, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, आनंदा पातोडे, अशोक पातोडे, संदीप दामोदर, अजय बाबर, लखन चव्हाण, राहुल अंभोरे, राजदर खान, गोपाल भाकरे, सचिन खंडारे, भगवान पाटोंड, विद्या पातोडे, युवराज डोंगरे, शिरू पाटील आखरे, हर्षल लोखंडे, प्रामुख्याने उपस्थित होते 

“गरिबांच्या घराचे स्वप्न केवळ कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीमुळे थांबू नये, यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. दर महिन्याला होणाऱ्या या कॅम्पमुळे तालुक्यातील एकही घरकुल लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ.” असे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे म्हणाले.


       
Tags: Vanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 

Next Post

नाशिक: मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गैरप्रकारांवर संताप; गृहपाल निलंबन व कारवाईची विद्यार्थिनींची मागणी

Next Post
नाशिक: मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गैरप्रकारांवर संताप; गृहपाल निलंबन व कारवाईची विद्यार्थिनींची मागणी

नाशिक: मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गैरप्रकारांवर संताप; गृहपाल निलंबन व कारवाईची विद्यार्थिनींची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बातमी

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

by mosami kewat
April 2, 2026
0

अहमदनगर : घारगाव येथे विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळावर झालेल्या भ्याड हल्ल्याने राज्यातील लोककलावंतांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला...

Read moreDetails
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

April 2, 2026
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home