नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोखारा जिल्हा परिषद सर्कल तालुका नागपूर ग्रामीण कार्यकारिणीच्या गठनासाठी मुलाखत बैठक व पक्षप्रवेश कार्यक्रम नुकताच जनसंपर्क कार्यालय, लोणारा येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अजय सहारे होते तर प्रा. अनिकेत मून यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला जिल्हा महासचिव पंकज शेलारे, कार्यालयीन सचिव वैभव येवले, शहराध्यक्ष शुभम वाहने तसेच ग्रामपंचायत सदस्य शुभांगीताई शेलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपच्या ग्रामपंचायत सदस्या पूजा खोब्रागडे (लोणारा), विपीन भांगे (खंडाळा), तसेच बसपाचे हेमराज जामगडे (बोखारा), उत्तम गाडेकर (बोखारा) यांच्यासह डेविड मानवटकर, निखिल तभाणे, जयदेव भांगे, प्रमोद भांगे, विजय वंजारी, प्रदीप आवळे, बबलू बिधाने, सुनील आवळे, सोनू खोब्रागडे, मितुंजय सवईथुल, अशोक यादव, राजेंद्र आवळे, रमिखार भुडवडे आदींनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
कार्यकारिणी पदांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच बोखारा जिल्हा परिषद सर्कलमधील विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस तालुका महासचिव अमन जामगडे, संजीव गहुकर, अशोक मेश्राम, सोनू खोब्रागडे, राजकुमार मेश्राम, विजय वंजारी, निखील तभाणे, अरविंद सवईतुल, डेव्हिड मानवटकर यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.