Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!

mosami kewat by mosami kewat
January 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!
       

ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची ‘रंगीत तालीम’ व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय, तर म्हणे ‘बजाज ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा!

सकाळी कामाला बाहेर पडल्यानंतर नागरिक चकित झाले. रस्त्यांच्या कडेला रोपे, पाट्या, कुंड्या, रस्त्यात करण्यात आलेले रंगरंगोटी पाहण्यास मिळाले. bajaj grand tour)

पुण्यात पार पडलेल्या ‘बजाज सायकल टूर’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले खरे, पण त्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती तेथील सुव्यवस्थेची! ही स्पर्धा पाहताना पुणेकर चकित झाले. सायकल स्पर्धेसाठी प्रशासनाने केलेली तयारी अत्यंत देखणी आणि नियोजनबद्ध होती. मात्र, यावरूनच आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नागरिकांकडून मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

नेहमी अशी स्वच्छता का नसते? असा सवाल करण्यात आले. सायकल स्पर्धेसाठी जे रस्ते रातोरात चकाकले, झाडझुडपे लावण्यात आली आणि कुंड्यांनी रस्ते सजले, तशी परिस्थिती पुणेकरांसाठी दररोज का नसते? तसेच अनेक ठिकाणी रस्ते खराब होते आणि कचऱ्याचे साम्राज्य होते. मात्र, स्पर्धा जाहीर होताच हे सर्व प्रश्न सुटले. मग प्रशासनाला हे काम आधी का सुचले नाही? केवळ आंतरराष्ट्रीय किंवा मोठ्या स्पर्धांसाठीच पुणे ‘स्वच्छ’ होणार का? (bajaj grand tour)

शहरातील खराब रस्ते आणि कचरा नियोजनाचे अपयश लपवण्यासाठी प्रशासनाने हा तात्पुरता ‘मेकओव्हर’ केला का, असा प्रश्न आता सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत. यावेळी “अशा स्पर्धा दर महिन्याला घ्याव्यात, जेणेकरून प्रशासनाच्या धाकाने का होईना, पुणेकरांना स्वच्छ पुणे पाहायला मिळेल.”  अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

रस्त्यांवरील साफसफाई, नवीन रंगरंगोटी आणि दिशादर्शक पाट्या लावून प्रशासनाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. पण हीच तत्परता सामान्य करदात्यांच्या दैनंदिन सोयीसाठी का दाखवली जात नाही? प्रशासनाला आपल्या कामाचे प्रदर्शन करण्यासाठी केवळ स्पर्धांचीच वाट पाहावी लागते का, ही खेदाची बाब आहे.


       
Tags: bajaj grand tourCyclegovernmentGrand tourMaharashtraPlayerspolicePoliticalPublicPunrroad
Previous Post

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक!

Next Post

महिला आशिया कप २०२६: भारत ‘अ’ संघाची घोषणा, राधा यादवकडे नेतृत्वाची धुरा!

Next Post
महिला आशिया कप २०२६: भारत ‘अ’ संघाची घोषणा, राधा यादवकडे नेतृत्वाची धुरा!

महिला आशिया कप २०२६: भारत 'अ' संघाची घोषणा, राधा यादवकडे नेतृत्वाची धुरा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home