अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी कडून यापूर्वीच करण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीचे ते अध्यक्ष आहेत. ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीला पाठवण्यात आला होता. यामध्ये बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी निधी वळवण्यात आला. यामध्ये बच्चू कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप ‘वंचित’ कडून करण्यात आला आहे.
कारवाईसाठी न्यायालयात याचिका.
याप्रकरणी ‘वंचित’ तर्फे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु पोलिसांकून कारवाई करण्यात आली नाही.
यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तक्रारीत सकृतदर्शनी तथ्य असल्याचे सांगत न्यायालयाने राज्यपालांच्या परवानगीसाठी ९० दिवसांची मुदत दिली आहे.