अकोला – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका जातीत साचलेल्या मराठी पत्रकारितेचे रुप पालटले आणि पत्रकारितेचा प्रवाह प्रशस्त केला. परंतु, एक पत्रकार म्हणून बाबासाहेबांचे महत्व इतिहासाने डावलले अशी खंत प्रा. डॉ. मुंद्रे यांनी व्यक्त केली. ते अकोला येथे मुकनायक व प्रबुद्ध भारत यांच्या संयुक्त वर्धापन दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले बाबासाहेब यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षातील टप्प्यांवर वेगवेगळी वर्तमानपत्रे सुरु केली. त्यामध्ये 1) 31 जानेवारी 1920 मुकनायक, 2) 2 एप्रिल 1927 बहिष्कृत भारत, 3) 29 जुन 1928 समता, 4) 24 नोव्हेंबर 1930 जनता.
भारत भूषण प्रिंटींग प्रेसचे बुध्दभूषण प्रिंटींग प्रेस असं नाव केलं. प्रबुध्द भारतच्या पहिल्याच अंकात पहिल्या पानावर एक बातमी प्रसिध्द होते आणि त्यामध्ये बाबासाहेब लिहितात, प्रधानमंत्री श्री नेहरु हटवादी, मुर्ख की गुलाम? एका साप्ताहिकातून थेट प्रधानमंत्र्यावर ताशेरे ओढले, एखाद्या निर्णयाचा समाचार घेतांना ते प्रधानमंत्री आहे की कोण याचा विचार केल्या जात नव्हता आणि अशी पत्रकारिता त्या काळात दिसते. आज तेच संपादकीय गुण अॅड. बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहेत. सुप्रिम कोर्टाने 12 आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानिक अशी पत्रकारिता प्रबुध्द भारतच्या माध्यमातून आज आपल्याला दिसते आहे. प्रबुध्द भारत पाक्षिकाचे दैनिकात रुपांतर व्हावे, आणि ते जनतेच्या योगदानातून व्हावे असे कार्यक्रमाचे शेवटी त्यांनी आवाहन केले.
प्रबुध्द भारतच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम स्थळी भारिप बहुजन महासंघाचे माजी महानगराध्यक्ष बुध्दरत्न इंगोले यांच्यावतीने 200 प्रबुध्द भारत प्रतींचे विनामूल्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन फुले आंबेडकर विद्वत सभा व प्रबुद्ध भारत शाखा अकोला यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फुले आंबेडकर विद्वत सभेचे पश्चिम विभागीय समन्वयक सिध्दार्थ देवदरीकर हे होते. कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितीमध्ये पि.जे. वानखडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा,प्रतिभाताई भोजने -अध्यक्ष, जि.प.अकोला, मा. प्रतिभाताई अवचार माजी जि.प. सदस्या, मा.प्रा. मन्तोषताई मोहोळ माजी पश्चिम महानगर महिला आघाडी अध्यक्ष, प्रा. संघपाल खंडेराव फुले आंबेडकर विद्वत सभा समन्वयक अकोला, गजानन भाऊ वाघमारे अध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघ अकोला जिल्हा, वृध्दरत्न इंगोले माजी महानगर अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, विजय जाधव, बुध्दरत्न इंगोले- माजी महानगर अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, विजय जाधव, हेमंत गणवीर, सदाशिव मेश्राम, मुकुंद गायकवाड, प्रा. अनिल शिरसाट, मा.जीवनभाऊ, देवानंद डोंगरे साहेब, धनराज वाकपांजर, अवधुत खडसे, राजेश अंभोरे, पि. एन. भटकर गुरुजी, श्रीधर तायडे, सचिन डोंगरे, पंकज खंडारे, रामा पोळ, राहूल गोटे, सुभाष तायडे, सिताराम इंगळे, डॉ. रंगारी, सुरेश इंगळे, शंकरराव इंगोले, अमोल पोळ, सुनिल तायडे, आशिष गोपनारायण, वकीला डोंगरे, महादेवराव इंगळे, नितीन प्रधान, गोलू खिल्लारे, नितीन काजळे, लाला राऊत, राजकुमार शिरसाट, उमेश रायबोले, राजुभाऊ खरगे, शाम उज्जैनवाल, शामप्रसाद दुबे, राजेश तायडे, सोनोने सर, गौतम इंगोले, सौ. गवईताई, आशाताई उमाळे, वानखडे ताई, डोंगरे ताई, इंदुताई उमाळे, भाऊसाहेब थोरात, राजेश मोरे इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन व महापुरुषांना हार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाला दै. सम्राटचे प्रतिनिधी मुंबई यांनी प्रबुध्द भारतच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबुद्ध भारतचे वितरक भगवान उमाळे अकोला यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विशाल नंदागवळी यांनी केले.