औरंगाबाद : औरंगाबादमध्ये ओबीसी समाजातील पाडसवान कुटुंबावर झालेल्या क्रूर हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.
यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबाला दिलासा देत, आरोपींना तात्काळ अटक होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
या भेटीप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण, राज्य सदस्य अमित भुईगळ, युवा प्रदेश सदस्य अमोल लांडगे तसेच प्रभाकर बकले उपस्थित होते.