वाशिम : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मालेगाव शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नुकताच एक संवाद दौरा पार पडला.
या दौऱ्यात आगामी काळात स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका जिंकण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या संवाद दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य आणि माजी आमदार नतीकुद्दीन खतीब आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि रणनीती यावर या नेत्यांनी विस्तृत चर्चा केली. या दौऱ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने मालेगावात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि निवडणुकीसाठी त्यांना सज्ज करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.