पुणे : पुण्यातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे शहराची हवा सातत्याने बिघडत आहे. २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ या वर्षात चांगल्या हवेच्या दिवसांमध्ये २७ दिवसांची घट झाली आहे, तर खराब हवेच्या दिवसांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताज्या पर्यावरण अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.
पुणेकरांच्या आरोग्यावर परिणाम
हवेच्या ढासळत्या गुणवत्तेचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे. पर्यावरण अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘उत्तम’ असलेले दिवस ७९ होते, जे २०२४-२५ मध्ये घटून ५२ झाले आहेत. त्याचबरोबर, खराब दिवसांची संख्या केवळ एकवरून तीनवर पोहोचली आहे. समाधानकारक दिवसांमध्येही घट झाली असून, ते १४५ वरून १३७ झाले आहेत, तर ‘मध्यम’ दिवसांची संख्या १४० वरून १७४ पर्यंत वाढली आहे. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की शहरातील हवा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत आहे.
वाहनांची वाढती संख्या: प्रदूषणाचे प्रमुख कारण
पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वायू प्रदूषणात वाढ होण्याचे एक प्रमुख कारण आहे. जुलै २०२५ पर्यंत पुण्यात एकूण ४१ लाख २५ हजार ९६८ वाहने झाली आहेत. गेल्या वर्षभरात यात सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये ही संख्या ३८ लाख ६३ हजार ८४९ होती.
या वाढत्या संख्येत इलेक्ट्रिक वाहने (३३,३८७), सीएनजी वाहने (४३,५३३) आणि हायब्रीड वाहने (५,७८१) यांचा समावेश असला तरी, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या अजूनही सर्वाधिक आहे, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढतच आहे.
डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ
वायू प्रदूषणासोबतच पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३,३७७ होती, ती २०२४-२५ मध्ये १,५८१ ने वाढून ४,९५८ झाली आहे. ही वाढती आकडेवारी सार्वजनिक आरोग्यासाठी एक नवीन आव्हान निर्माण करत आहे. पुणे शहरातील वाढते प्रदूषण आणि आरोग्य समस्या लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails