अकोला : अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होत पक्षाला बळकटी दिली आहे. यामध्ये धनगर समाज युवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सुमित नवलकार आणि युवा सेना उपजिल्हा प्रमुख रविराज घोंगे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
या पक्ष प्रवेशावेळी उपसरपंच भगवन पातोंड, सरपंच शिवदास पांडे, प्रशांत पातोंड, अनिल बाहे, चेतन दिवणाले, तेजस कात्रे, सचिन कोगदे, संजय गव्हाळे, विठ्ठल नांदूरकर, अवधूत नागे, गणेश नागे, श्याम पातोंड, संदीप सुशीर, तेजराव शिंदे, गोपाल नवलकार, चिंतामण पातोंड, अमोल घोंगे, मार्तंड साबळे, मंगेश साबळे, सोनु भदे, अक्षय घटाळे, प्रमोद पातोंड, अमोल कात्रे, सुभाष कळंब, ऋत्विक दिवणाले आणि प्रफुल दिवणाले हे धनगर समाजाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
या सामूहिक प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला अकोला जिल्ह्यात अजून ताकद मिळाली आहे.