अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र पातोडे यांची दणदणीत निवड झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रदेश कार्यकारिणीच्या प्रदेश सदस्यपदी सुजातदादा आंबेडकर, डॉ. अरुण जाधव, प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉ. चित्रा कुर्हे, दीपक डोके, नागोराव पंचाल, सर्वजीत बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर आणि उत्तम वनशिव यांचा दणदणीत विजय झाला.
या विजयानिमित्त अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





