अकोला : दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी अकोला शहर व परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याने घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच घरगुती सामान पाण्यात भिजून खराब झाले, तर काही ठिकाणी वस्तू वाहून गेल्याचेही दिसून आले.
नाल्यांची क्षमता अपुरी असून अरुंद रस्ते व लहान रपट्यांमुळे पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली आहे.
आघाडीने केलेल्या मागण्यांमध्ये – नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत, प्रत्येक प्रभागातील अरुंद नाले-नाल्यांचे रूंदीकरण, कायमस्वरूपी स्ट्रीटलाईट व्यवस्था, सर्व नाल्यांची तातडीची साफसफाई, भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, हद्दवाढीतील खरप, न्यू तापडीया नगर, गुडधी, उमरी, ताथोड नगर, पंचशील नगर, शिवणी, मलकापूर, खडकी, राजेश्वर नगर, डाबकी, गजानन नगर, संत कबीर नगर, दुबे वाडी, गीता नगर, जेतवन नगर, खदान, महात्मा फुले नगर, कैलास टेकडी, नायगाव आदी भागांत नागरिकांना मोठे नुकसान सोसावे लागले असल्याचे आघाडीने नमूद केले आहे.
या निवेदनावेळी मनोहर बनसोड, गजानन गवई, योगेश वडाळ, पराग गवई, अमोल कलोरे, गजानन दांडगे, सुरेश मोरे, नितेश कीर्तक, विनोद खंडारे, शंकरराव इंगोले, पुरुषोत्तम वानखडे, निलेश वाहुरवाघ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट!
मालेगाव : 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बॉम्बस्फोट झाला होता. बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...
Read moreDetails