अकोला : जिल्ह्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पंचायत, नगरपालिका इत्यादी निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा “संवाद दौरा” अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये येणाऱ्या 26 ते 30 तारीख पर्यंत होणार आहे. (Akola)
या दौऱ्याचे नियोजन करण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वयक माजी आमदार खतीब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक काल अशोक वाटिका अकोला येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. (Vanchit Bahujan Aaghadi)
या बैठकीला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे, मिलिंद इंगळे, नंदकुमार डोंगरे, आम्रपाली ताई खंडारे, संगीताताई अढावु, श्रीकांत घोगरे, धीरज इंगळे व सर्व विंगचे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती माजी सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत माजी सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व पक्षाचे अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Pune Students Protest : पुण्यात संशोधक फेलोशिपसाठी विद्यार्थी आक्रमक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची घेतली भेट
पुणे : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आणि अमृत या शासकीय संस्थांनी मागील तीन वर्षांपासून संशोधक फेलोशिपची जाहिरात न काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये...
Read moreDetails