संजीव चांदोरकर
भारतातील सर्वात पहिल्या कामगार संघटनेला “आयटक” ला, १०५ व्या स्थापना दिवसानिमित्त शुभेच्छा !
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), हि कामगार संघटनाची भारतातील पहिली फेडरेशन , ३१ ऑक्टोबर १९२० रोजी स्थापन झाली
आयटक कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असली , तिचा झेंडा लाल बावटा असला तरी लाला लजपतराय , जवाहरलाल नेहरू , सुभाषचंद्र बोस या व्यक्ती आयटकच्या अध्यक्ष राहिल्या आहेत हे आज मुद्दामहून सांगितले गेले पाहिजे
कोणत्याही समाजाला, देशाला वर्तमानात एकसंघपणे जगायचे असेल, आपण विखरून जाणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर विविध प्रकारच्या संस्था , संघटना सतत कार्यरत असाव्या लागतात
मनुष्यकेंद्री समाज आणि अर्थव्यवस्था निर्माण करायची तर कामगार , कष्टकरी , महिला आणि तत्सम संघटना तगड्या असल्या पाहिजेत.
आपल्या देशातील कामगार , कष्टकऱ्यांना एकत्र येण्याचे , एकत्र राहण्याचे महत्व गेली शंभर वर्षे चिकाटीने सांगत असल्याबद्दल आयटकचे आभार
आयटक आणि तिच्या अनेक संलग्न कामगार संघटना उभ्या राहाव्यात म्हणून आपले व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून आयुष्य वेचणाऱ्या असंख्य अनामिक कार्यकर्त्यांना लाल सलाम !
कामगार संघटनांच महत्व अधोरेखित करण्यासाठी आयटक चा स्थापना दिवस हे निमित्त आहे. देशात गेली अनेक दशके कामगार, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी , स्त्रिया अशा अनेक समाज अर्थ घटकांच्या संघटना कार्यरत आहेत. त्या सर्वांच्या कामाचे मोल मोठे आहे.
गेल्या काही वर्षात कामगार संघटना हेतुतः कमकुवत होतील हे बघितले गेले आहे. कामगार संघटना कमकुवत होणे आणि उजव्या / संकुचित बिगर वर्गीय अस्मितावादी सामाजिक राजकीय शक्ती वाढणे यांचा परस्परसंबंध आहे.
आपला देश तरुणांचा असल्यामुळे साहजिकच कामगार / सर्व प्रकारच्या कष्टकरी वर्गात तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. तरुणांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या क्षेत्रात असणाऱ्या अशा संघटनांमध्ये रस घेतला पाहिजे. समाजकार्य म्हणून नाही तर ट्रेड युनियन सारखे सामायिक व्यासपीठच त्यांच्या व्यक्तिगत हिताचे संरक्षण करू शकणार आहे. सुट्या व्यक्ती स्वतःचे हितरक्षण करू शकत नाहीत
एकविसाव्या शतकातील समाजवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी आयटक आणि तशाच इतर कामगार संघटना / फेडरेशन्स अधिकाधिक सक्षम होवोत हि सदिच्छा!
 
			

 
							




