Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Mumbai News : एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग

mosami kewat by mosami kewat
June 16, 2025
in बातमी
0
एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग

एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग

       

मुंबई : एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत घडणाऱ्या तांत्रिक बिघाडांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. नुकतीच अहमदाबादच्या विमानात घडलेली घटना ताजी असतानाच, आता हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडिया AI315 या फ्लाइटमध्ये देखील गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Air India flight)

विमान दिल्लीकडे न घेता तातडीने हाँगकाँगमध्ये परत पाठवण्यात आले. तेथे विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. (Air India flight)

काय घडलं नेमकं?

AI315 हे बोईंग प्रकारचे विमान हाँगकाँगहून दिल्लीकडे रवाना झाले होते. विमानात तांत्रिक अडचणी जाणवू लागल्या. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम न घेता, विमान पुन्हा हाँगकाँगच्या दिशेने वळवण्यात आले. हाँगकाँग एअरपोर्टवर विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडिया विमान कंपनीच्या अनेक फ्लाइट्समध्ये अशा स्वरूपाचे बिघाड आढळत आहेत. काही प्रकरणांमध्ये उड्डाणाच्या वेळीच अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर काही वेळा लँडिंग दरम्यानही तांत्रिक बिघाड समोर आले आहेत. (Air India flight)


       
Tags: Air India planeHongKonglandingMaharashtramumbaitechnical
Previous Post

Mumbai News : नागरिकांचा संताप! गिरगावमध्ये रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात अडकली

Next Post

“भाजपची बी टीम कोण?” सुजात आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल!

Next Post
"भाजपची बी टीम कोण?" सुजात आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल!

"भाजपची बी टीम कोण?" सुजात आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात संशोधक फेलोशिपसाठी विद्यार्थी आक्रमक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची घेतली भेट
बातमी

Pune Students Protest : पुण्यात संशोधक फेलोशिपसाठी विद्यार्थी आक्रमक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची घेतली भेट

by mosami kewat
September 17, 2025
0

पुणे : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आणि अमृत या शासकीय संस्थांनी मागील तीन वर्षांपासून संशोधक फेलोशिपची जाहिरात न काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये...

Read moreDetails
पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य

पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य

September 17, 2025
अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

Solapur : अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

September 17, 2025
मुंबई विद्यापीठात भंतेजींवर सुरक्षारक्षकांची मारहाण; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव!

मुंबई विद्यापीठात भंतेजींवर सुरक्षारक्षकांची मारहाण; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव!

September 17, 2025
Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

September 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home